मुंबई,: शारीरिक आणि मानसिक दिव्यांगांकरिता त्यांचे अधिकार आणि सन्मान मिळवून देण्यासाठी गेली १२ वर्षे अविरत कार्यरत असलेली 'नूतन गुळगुळे फाउंडेशन' (एनजीएफ) ही मुंबईतील सुप्रसिद्ध संस्था असून या संस्थेचा येत्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सातवा “राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार - २०२3" च्या सोहळ्यासाठी इच्छुकांनी आपल्या प्रवेशिका सादर कराव्यात असे आवाहन 'नूतन गुळगुळे फाउंडेशन'च्या अध्यक्षा सौ. नूतन गुळगुळे यांनी केले आहे. विविध भाषा - परंपरा आणि संस्कृती असलेल्या भारतातील आपल्या अनेक राज्यांतील दिव्यांगांकडून नामांकनांसाठी गेली सहा वर्षे भरघोस प्रवेशिका प्राप्त होतात, कोविड काळातही या पुरस्कारांसाठी देशातून दिव्यांगांनी उल्लेखनीय प्रतिसाद दिल्याने या वर्षी अधिक उत्साहाने हा भव्य सोहळा आम्ही करणार असल्याचे त्या म्हणाल्या. अध्यक्षा, नूतन गुळगुळे, संस्थेचे सल्लागार समिती अध्यक्ष जेष्ठ कर्करोग तद्न्य डॉ. संजय दुधाट, अमरनाथ तेंडूलकर, पुष्कर, विनायक गुळगुळे प्रवेशिका सादरकरण्याबाबत आवाहन केले आहे. मानपत्र, रोख रक्कम, आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवमूर्तींचा सन्मान धेय्यपूर्ती सोहळ्यात केला जातो.
अर्जदारांची मुलभूत पात्रता पुरस्काराच्या सर्व प्रवर्गांसाठी ग्राह्य धरण्यात येईल, अर्जदार व्यक्ती ही शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या दिव्यांग असावी, त्यासोबतच त्यांनी काहीतरी अद्वितीय कर्तृत्व सिद्ध केलेले असावे, आपल्या कौशल्यांचा उत्तम वापर करून आपल्या व्यवसायात/जीवनात एखादी सर्वसाधारण व्यक्ती विचार करू शकणार नाही, असे काहीतरी अलौकिक सिद्ध केलेले असावे. अशी एखादी कामगिरी, ज्यामुळे इतरांच्या/ समाजाच्या कल्याणासाठी दिलेले भरीव योगदान पुरस्कार नामांकन मिळवण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल.
वैयक्तिक श्रेणीतील पाच पुरस्कारांसोबतच 'माय लेक पुरस्कार', 'कौटुंबिक पुरस्कार'(एकाच कुटुंबातील दोन /तीन सभासद दिव्यांग असतील), तसेच 'संस्था पुरस्कार'( सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था), 'जीवन गौरव पुरस्कार' (६५ वय व अधिक), आणि मरणोत्तर पुरस्कार. असे दहा पुरस्कार देऊन विलक्षण कर्तृत्व गाजविणाऱ्या दिव्यांगांची गौरवगाथेचा सन्मान केला जाणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, विश्वविख्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम, भारत सरकारच्या अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि विभागाचे प्रमुख अधिकारी डॉ. अनिल काकोडकर अश्या अनेक प्रभुतींनी या व्यासपीठावरून दिव्यांगांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज नोंदणीकृत कार्यालयात ३० सप्टेंबर २०२3 पर्यंत, त्यांच्या संपूर्ण माहितीसह अपंगत्वाची श्रेणी व टक्केवारी(अधिकृत प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत), पासपोर्ट आकाराचे एक छायाचित्र, व्हिडिओ, छायाचित्रे(फक्त 4) सीडी अथवा पेन ड्राईव्हमध्ये २/८, मार्गदर्शन सोसायटी, प्रोफ. न. स. फडके मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०००६९ या पत्त्यावर किंवा nutangulgulefoundation@gmail.com या ईमेल लवकरात लवकर पाठवावी.
संपर्क क्रं. 9920383446 / 9819141906 / 9594939275 / 9819873906
प्रसिद्धी जनसंपर्क प्रमुख : राम कोंडीलकर,